ब्रिटीश राजवटीत अंदमान निकोबारमधील तुरुंगवासाला काळ्या पाण्याची शिक्षा मानलं जात असे. याच अंदमान-निकोबारमधील तुरुंग व्यवस्थेत केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे. ब्रिटिश काळापासून लागू असलेल्या जुन्या तुरुंग कायद्यांच्या जागी नवे कायदे लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार तुरुंगात कैद्यांमध्ये जातीनुसार भेदभाव करता येणार नाही.

तसेच जातीच्या आधारावर कैद्यांना वेगवेगळं ठेवणं किंवा त्यांना कामं वाटून देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. चांगलं वर्तन असलेल्या कैद्यांसाठी खुल्या आणि अर्धखुल्या तुरुंगांची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे..केंद्र सरकारने बुधवारी 'अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह कारागृह आणि सुधार सेवा विनियमन २०२६' अधिसूचित केलं.

या नव्या कायद्यामुळे १८९४ चा जेल कायदा, १९०० चा बंदी कायदा आणि १९५० चा कैद्यांच्या हस्तांतरणासंबंधीचा कायदा रद्द होणार आहे. विशेष म्हणजे याच अंदमान-निकोबारमध्ये ब्रिटिश काळात स्वातंत्र्यसैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात होती. पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल यासाठी ओळखली जाते..संस्कृतमध्ये गोल्ड, आता ITIमध्ये देशात टॉपर; रिक्षाचालकाच्या मुलीचं यश, पंतप्रधान मोदी करणार गौरव.नव्या कायद्यानुसार तुरुंगात चांगलं वर्तन ठेवणाऱ्या कैद्यांना खुल्या आणि अर्धखुल्या तुरुंगात राहण्याची संधी मिळू शकते.

मात्र यासाठी कैद्यांनी चांगलं वर्तन ठेवणं आणि शिक्षेचा निर्धारित कालावधी पूर्ण करणं आवश्यक असेल. कैद्यांचं वय, आरोग्य, सुरक्षेचा धोका आणि सुधारणेची गरज लक्षात घेऊन त्यांचं वर्गीकरण केलं जाणार आहे..तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठीही नव्या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत. तुरुंगात परवानगीशिवाय मोबाईल किंवा इतर प्रतिबंधित संपर्क साधनं ठेवल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

सीसीटीव्ही, बायोमेट्रिक यंत्रणा आणि डिजिटल नोंदींचा वापरही वाढवण्यात येणार आहे..महिला कैद्यांसाठी गरोदरपणात काळजी आणि स्वतंत्र सुविधांची तरतूद करण्यात आली आहे. आईसोबत तुरुंगात राहणाऱ्या सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग कैद्यांसाठी योग्य निवास, आरोग्यसेवा आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाणार आहे.

जातीच्या आधारावर होणारा भेदभाव आणि हाताने मैला उचलण्यासारख्या प्रथांनाही या कायद्याने बंदी घातली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.

Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.